लग्नाचे वऱ्हाड नेणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात ; 30 हुन अधिक वऱ्हाडी जखमी

कणकवली (प्रतिनिधी): वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर बोलेरो पिकप ने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात जवळपास 30 हुन अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. देवगड पाडगाव च्या दिशेने जाणारे हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकप चालकाने डिव्हायडरवर पिकप गाडी चढवल्याने महामार्गावर पिकप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोके, हाताला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळतात महामार्गावरून जाणाऱ्या राजा पाटकर यांच्यासह वागदे सरपंच संदीप सावंत, यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जि प उपाध्यक्ष रंजन राणे, हृतिक नलावडे, यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अनेक अनेकांना गंभीर इजा झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!