सिंधुदुर्गात दुसऱ्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 877 केस निकाली

2 कोटी 12 लाख 74 हजार रक्कमेची तडजोड वसुली

ओरोस (प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने नुकतेच जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये २०२३ या वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. यावेळी एकुण ९४४५ प्रकरणांपैकी ८७७ प्रकरणे तडजोडीने निकाली होवुन एकुण दोन कोटी बारा लाख चौ-याहत्तर हजार दोनशे पंधरा रुपये एवढी तडजोडीची वसुली झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!