कणकवली (प्रातिनिधी): वागदे येथे लग्नाचे वऱ्हाड नेणारा टेम्पो पलटी होऊन अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपजिल्हा रुग्णालयात जात आस्थेने विचारपूस केली. आज लग्नाचे वऱ्हाड नेणारा टेम्पो वागदे येथे पलटी होत अपघात झाला. या अपघातात 30 हुन अधिक वऱ्हाडी जखमी झाले. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपजिल्हा रुग्णालयात जात सर्व अपघातग्रस्त जखमींची पाहणी करत विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वतोपरी वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही केल्या.
वागदे तील टेम्पो अपघातग्रस्तांची भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलीनी केली विचारपूस












