रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या पेंशन प्रश्नी रावजी यादव यांनी छेडले घंटानाद आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मे महिना उजाडला तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याची पेन्शन मिळाली नसल्याने माजी सहाय्यक प्रशासन अधिकारी रावजी गंगाराम यादव यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाने शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शासन अनुदानीत संस्थामधुन नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या सेवेच्या मोबदला म्हणून दरमहा त्यांना देय असलेली पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देऊन बरीच वर्षे झाली. मार्च महिन्याची पेंशन एप्रिल मध्ये जमा होणे आवश्यक होते. परंतु आज ०२ मे २०२३ उजाडली तरी मार्च ऐंड एप्रिलची पेन्शन जमा झाली नाही. म्हणून मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र, मा. जिल्हाधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ आणि पोलीस खाते यांना शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार दि. २० एप्रिल २०२३ रोजी निवेदन देऊन लक्ष वेधन्यात आले होते. परंतु म्हणावी तशी कुणी दखल घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी आज रावजी यादव यांनी जिल्हा परिषदे समोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. तसेच दरमहा १ तारखेला पेन्शन जमा व्हावी. अशी मागणी रावजी यादव यांनी केली आहे. तसेच जर दरमहा १ तारिखला पेंशन जमा झाली नाही तर त्या त्या महाच्या २ तारीख पासून पेन्शन जमा होईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेश व्दारावर घंटानाद आंदोलन सुरु केले जाईल असा इशारा त्यानी दिला आहे.

error: Content is protected !!