देवगड पोलीस निरीक्षक बगळेंचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका

मिठबाव, मुणगे, दहीबाव मध्ये गोवा बनावटीच्या दारूविक्रीवर देवगड पोलीस पथकांची छापेमारी

देवगड (प्रतिनिधी): देवगड पोलीसांनी मिठबांव,मुणगे व दहिबांव या विविध ठिकाणी गोवा बनावटीची दारु विक्री करीत असणा-या तिघांविरुध्द देवगड पोलीस ठाण्यामध्ये 65 ई दारुबंदी अधिनियम कायदयांतर्गत कारवाई करुन 4250 रकमेची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. मिठबांव येथील मंगेश लोके हे वळीवंडे आरे फाटा येथील एका नायलॉन पिशवीमध्ये 950 रुपयांची गोवा बनावटीची दारु गैरकायदा विनापरवाना चोरटी विक्री करण्याच्या उददेशाने आपल्या ताब्यात बाळगली म्हणून त्याला देवगड पोलीसांनी रंगेहाथ पकडून त्याच्यावरती दारु अधिनियम 65 ई प्रमाणे कारवाई केली आहे. दहिबांव कुपलवाडी येथील विकास मधुकर तारकर हे गोवा बनावटीची 2400 रुपयांची दारु विनापरवाना गैरकायदा विक्रीचा धंदा करण्याच्या उददेशाने व स्वतच्या फायदया करीता बाळगल्याप्रकरणी देवगड पोलीसांनी त्यांना पकडून त्याच्यावरती दारु अधिनियम 65 ई प्रमाणे कारवाई केली आहे. तसेच मुणगे वाघोबाची वाडी येथील दशरथ भिकाजी मुणगेकर यांनी 900 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु विक्री करण्याच्या उददेशाने बाळगल्याप्रकरणी दशरथ मुणगेकर यांच्यावरती देवगड पोलीसांनी त्यांना पकडून त्याच्यावरती दारु अधिनियम 65 ई प्रमाणे कारवाई केली आहे. सदरची कारवाई देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीसांनी केली आहे. सदरच्या कारवाई हया रविवार, सोमवारी केल्या आहेत.

error: Content is protected !!