भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची तहसीलदारांकडे मागणी
कणकवली ( प्रतिनिधी ) : यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरी कमी होते. त्यातच जानवली नदीपात्रात पाणीसाठा कमी झाल्यामुळे नागवे, कलमठ, जानवली, करंजे, साकेडी, वरवडे, पिसेकामते या गावांत पाणीटंचाई ची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हरकुळ ( खु. ) धरणातील पाणी जानवली नदीपात्रात सोडावे अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी कणकवली तहसीलदारांकडे केली आहे. जानवली नदीपात्रात धरणाचे पाणी सोडल्यामुळे लगतच्या गावांतील भूजलपातळी वाढण्यास मदत होईल आणि संभाव्य पाणीटंचाई टळेल असे मेस्त्री यांनी निवेदनात म्हटले आहे.












