कणकवलीतील ज्येष्ठ व्यावसायिक उल्हास बांबुळकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यावसायिक उल्हास विठ्ठल बांबुळकर (वय ८०) यांचे नुकतेच निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बांबुळकर कुटुंबावर शोककळा पसरली असून, कणकवली शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, भगिनी, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाटळ येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता बांबुळकर-तेली यांचे ते वडील होत. कणकवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची कन्या प्रणिता बांबुळकर यांनी त्यांना भडाग्नी दिला.

error: Content is protected !!