खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दीन व कामगार दिनाचे औचित्य साधून पणदुर,कुडाळ येथील जीवन आनंद संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सविता आश्रमधील निरधरांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाचा विशेष सत्कार संस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला प.पू.भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्थेचे संचालक राजेश वारंगे, परवेज पटेल,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे, व्यवस्थापक सत्यवान खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.तर जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब,सदस्य देऊ सावंत,आशिष कांबळी, आरती वायंगणकर, निता गावडे, विजया कांबळी,श्री महाबळेश्वर कामत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण पतसंस्थेच्या वतीने सविता आश्रम मध्ये काम करणाऱ्या एकूण ३८ कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र,पुषपगुच्छ व आर्थिक प्रोस्थाहनपर मदत देऊन गौरविण्यात आले.तसेच पतसंस्थेच्या वतीने सविता आश्रम मधील निराधार बांधवांना २४० बिस्कीट पुड्यांचे खाऊ वाटप करण्यात आले.सविता आश्रमाच्या वतीने अध्यक्ष संदीप परब यांनी खारेपाटण संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. “प.पू.भालचंद्र महाराजांच्या आशीर्वादाने खारेपाटण पतसंस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरू असून संस्थेचे विद्यमान चेअरमन नासीर भाई काझी माजी चेअरमन प्रवीण लोकरे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध शेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कामगार दिनी सत्कार करण्यात येतो. यावेळी सविता आश्रम मधील निराधार बांधवांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना आम्हाला अत्यानंद होत असल्याचे भावपूर्ण उदगार प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी यावेळी व्यक्त केले.”संस्थेचे संचालक परवेज पटेल,राजेश वारंगे,मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत सविता आश्रम मधील सर्व कर्मचाऱ्याना कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.