चिंचवली मधली वाडी जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. चिंचवली गुरववाडी येथील होतकरू तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने गुरववाडी हितवर्धक मंडळाची स्थापना केली आहे.या मंडळाच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून चिंचवली मधलीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. याही वर्षी मंडळाने ही परंपरा जोपासत चिंचवली मधलीवाडी शाळेसहित चिंचवली नं.१व कुरंगवणे भंडारवाडी या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
शैक्षणिक साहित्याचे वाटप सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती श्री.बाळा जठार ,कणकवली पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. तृप्ती माळवदे, चिंचवली गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. सूर्यकांत भालेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी चिंचवली उपसरपंच राजेंद्र पेडणेकर,पोलीस पाटील दिगंबर भालेकर, माजी सरपंच अनिल पेडणेकर, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीकांत भालेकर,सिताराम पांचाळ,युवा कार्यकर्ते स्वप्निल भालेकर,सुशील भालेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष संतोष गुरव, उपाध्यक्ष दीपक गुरव मंडळाचे मार्गदर्शक दिलीप गुरव मंडळाचे सदस्य रवींद्र गुरव, सुहास गुरव ,संतोष गुरव ,कृष्णा गुरव,नितेश गुरव,अमोल गुरव ,दीपक गुरव, प्रथमेश गुरव ,संदेश गुरव, पिंट्या गुरव, राजा गुरव, अक्षय गुरव, निहाल गुरव आदी उपस्थित होते. चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणदेखील याचवेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी श्री बाळा जठार यांनी चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाच्या कार्याचे कौतुक आपल्या मनोगतातून केले. चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल शाळेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन चिंचवली मधलीवाडी शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. सविता पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!