निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बरसेवाडी, भुदरगड-कोल्हापूर यांचे सहकार्य
मालवण (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने उद्या मंगळवार 16 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 यावेळेत चिंदर ग्रामपंचायत येथे होणार आहे. हे शिबीर निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बरसेवाडी, भुदरगड-कोल्हापूर यांच्या सहकार्य आयोजित करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबीर सर्व वयोगटातील नागरीकांची असून (ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी, गुडगेदुखी, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, इ. तपासणी), सर्व नागरीकांना मोफत औषधे उपलब्ध असणार आहेत. तसेच ४० वर्षावरील लोकांची मधुमेह तपासणी मोफत होणार आहेत. सर्व वयोगटातील नागरीकांची मोफत रक्त तपासणी होणार आहे.(एच.बी. सी.बी.सी., कॅलशियम, कॉलेस्ट्रॉल, शुगर) तसेच धनुर्वात इंजेक्शन मोफत व इसीजी तपासणीही मोफत होणार आहे. नेत्र तपासणी मोफत फक्त नंबर काढून मिळणार आहे व चष्मे हवे असल्यास अल्प दरात दिले जातील. बालकांसाठी व अंपगासाठीही मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा -सरपंच सौ. राजश्री राजेंद्र कोदे असून प्रमुख उपस्थिती आप्पासाहेब गुजर (गटविकास अधिकारी प.स. मालवण ), शाम चव्हाण (सहा. गटविकास अधिकारी पं.स. मालवण), डॉ. शामराव जाधव (तालुका वैद्यकिय अधिकारी), डॉ. कपिल मेस्त्री (वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र आचरा), उपसरपंच दिपक सुर्वे, धोंडू चिंदरकर (माजी पं.स. सभापती), संतोष कोदे (माजी सरपंच), हिमाली अमरे (माजी पं.स. सभापती), संतोष गांवकर (अध्यक्ष तंटामुक्ती समिती), चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, उद्योजक प्रकाश मेस्री, चिंदर ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.