जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; गाड्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जयवंत उर्फ डॅडी सह 12 जणांवर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नागवे येथील माळावर चाललेल्या जुगार अड्डयावर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकण्यात आली. अचानक धाड पडल्याने अंधाराचा फायदा घेत काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पळताना काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. या धाडीत चार चाकी आणि दुचाकी यांच्यासह बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. कणकवली पोलिसांना नागवे माळरानावर जुगार अड्डा सूरु असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. खेळी कणकवली, मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथील होते. या कारवाईत जयवंत आत्माराम बाईत, (वय ४९ वर्षे, रा. कणकवली तेलीआळी), सिध्देश भास्कर ठाकुर, (वय ३९ वर्षे, रा. कलमठ लांजेवाडी, ता. कणकवली), संतोष बाळकृष्ण कुडतरकर, (वय ५० वर्षे, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), विशाल वासुदेव सावंत, (वय ४५ वर्षे, रा. सावंतवाडी वैश्यवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), केतन रावजी ढोलम (वय ३५ वर्षे, रा. कोळ आडारीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, मुळ रा. मुंबई), महेश गंगाधर जोगी, (वय ३२ वर्षे, रा. मालवण बाजारपेठ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), कुलराज भगवान बांदेकर, (वय २२ वर्षे, रा. मालवण जोशीवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), शुभम कृष्णकांत मिठबावकर, (वय २२ वर्षे, रा. मालवण हडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), रोहन जितेंद्र वाळके, (वय २९ वर्षे, रा. मालवण देऊळवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), हेमराज प्रकाश सावजी, (वय ३० वर्षे, रा. वायरी भुतनाथ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), विनायक शिर्के (रा. कलमठ कणकवली), सहीत आचरेकर (रा. कणकवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी सांगितले. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!