नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत संजयजी गुप्ता यांनी दर्शविली सकारात्मकता

कणकवली (प्रतिनिधी): कोकण रेल्वे तिकीट आरक्षण घोटाळा, दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना होणारा त्रास थांबवणे, आगामी गणेश उत्सवासाठी या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या मागणीसह कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला पुन्हा थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते, कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीरभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणवासीय शिष्टमंडळाने आज दि.२५ मे २०२३ कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजयजी गुप्ता साहेब यांची भेट घेतली.. यावेळी झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. नांदगाव रेल्वे स्थानकातून फोंडाघाट, नांदगाव, कासार्डे या गावांच्या दशक्रोशीसह देवगड, विजयदुर्ग व घाटमाथ्यावरील राधानगरी भागातील प्रवासी प्रवास करतात. या स्थानकावर नियमित फक्त दिवा सावंतवाडी पॅसेंजर थांबते. या स्थानकावर सुरवातीपासून थांबणारी गाडी नंबर ११००३/११००४ अप डाऊन दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस कोरोना काळात बंद करण्यात आली होती. तिला अद्याप थांबा दिलेला नाही. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे व दशक्रोशीतील रेल्वे प्रवासी ग्रामस्थांनी यापूर्वी खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.. यावेळी पुन्हा नव्याने खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मागणी केली असता संजयजी गुप्ता यांनी नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!