प्रशासनाकडून व्यवस्था होईपर्यंत आ. वैभव नाईक यांनी स्वखर्चाने कोळंब पाठोपाठ कुंभारमाठ वासियांना केला टँकरद्वारे पाणीपुरवठा

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील गावात पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाली असून आ. वैभव नाईक यांनी कुंभारमाठ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यामुळे नागरिकांनी जाहीर आभार मानले. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठयाची व्यवस्था होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी कालपासून स्वखर्चाने तातडीने नागरिकांची पाण्याची समस्या टँकरद्वारे करत मार्गी लावली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने पाणी टंचाई भागात पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुंभारमाठ शाखाप्रमुख सदा करंगुटकर, यांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य राहुल परब, सुवर्णा भोगवकर, तृप्ती लंगोटे, गुडेकर, संजय देऊलकर, मालवण उप शहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा उप शहरप्रमुख उमेश चव्हाण,अनिल भोगावकर, हेमंत मोंडकर, राजू साळगावकर, दादा पाटकर आदिंसह कुंभारमाठ ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!