यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी

खारेपाटण येथील कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ८७.९१%

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यापीठाकडून नुकताच जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. मुंबई विद्याीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये खारेपाटण महाविद्यालयातून वाणिज्य शाखेद्वारे फायनान्शिअल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग व व्यवसायिक व्यवस्थापन विषयात एकूण ९१ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून, कु. शाहिस्ता खान हिने ६७.९२% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु. नवेद मुकादम व कु. सौरभ पेंडकलकर यांनी ६७.३३%, ६४.३६ % क्रमशः द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण लोकरे व सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या कडून मिळाली.

error: Content is protected !!