कुडाळ मध्ये स्पेशल योगा क्लासेस चा शुभारंभ

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

कुडाळ (अमोल गोसावी) : लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लब कुडाळ आयोजित स्पेशल योगा क्लासेस ची सुरुवात काल १५ जून पासून कुडाळ येथील कुडाळेश्वर मंदिर नजीक दैवज्ञ समाज हॉल येथे करण्यात आली. यावेळी या योगा क्लासेसचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी कुडाळ नगराध्यक्ष मंदार शिरसाट , अतुल बंगे , प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ तथा योगा क्लबचे अध्यक्ष डॉ. योगेश नवांगुळ , उपाध्यक्ष जयंत चमणकर सचिव डॉ. शरावती शेट्टी , सहसचिव योगिता वालावलकर , खजिनदार ॲड. अलोन परदेसी , प्रकाश चव्हाण आदी जण उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जिवनात शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची गरज आहे . योगामुळे आपण निरोगी राहतो तसेच योगामुळे मानसिक विकारांपासून संरक्षण होते त्यामुळे योगाची नितांत गरज आहे. कुडाळ मधील होणाऱ्या क्रिडा संकुलात लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लबला कायमस्वरूपी संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे डॉ. योगेश नवांगुळ यांनी सुद्धा योगाचे महत्व पटवून देताना योगामुळेच नेहमीच शरीरात ऊर्जा व उत्साह वाढतो त्यामुळे आपण अनेक विकारांपासून दूर राहतो असे सांगतानाच लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लब हा सिंधुदुर्गमधील सर्वात मोठे सेंटर असून यासाठी डॉ. वसंतराव मोरे वेंगुर्ला , डॉ. संपदा पुराणिक आरोंदा स्नेग्धा बांबुळकर या प्रशिक्षित ट्रेनरचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती दिली.

error: Content is protected !!