खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरगवणे गावचे सुपुत्र व खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती खारेपाटण या समितीचे मुंबई येथील सक्रिय कार्यकर्ते कै.ज्ञानेश्वर श्रीधर पवार यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्या करीता समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व शोकसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.
खारेपाटण तालुका निर्मितीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठीं व खारेपाटण तालुका झालाच पाहिजे. या मोहिमेत कै.ज्ञानेश पवार यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली व शोकसभा कार्यक्रमाला खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष व खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत,सचिव संतोष पाटणकर,उपाध्यक्ष मंगेश गुरव, खजिनदार महेश कोळसुलकर,कुरगवणे गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,खारेपाटण व्यापारी असो.चे अध्यक्ष प्रजाल कुबल, समिती सदस्य राजेंद्र वरुणकर, सुधीर कुबल,वीरेंद्र चिके,ऋषिकेश जाधव,कुरगवणे गावचे ग्रामस्थ रवींद्र लाड,संतोष जाधव,प्रवीण गोड, राजेंद्र लाड,सत्यवान लाड,अशोक जाधव,ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत जाधव, अंकुश सदिकले आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने त्यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.’कै.ज्ञानेश पवार या आपल्या मित्राला खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आपल्या खारेपाटण तालुका निर्मितीचे आपले अधुरे राहिलेले स्वप्न.आपण सर्वांनी मिळून पूर्ण करणे गरजेचे आहे.हीच कै.ज्ञानेश पवार या आपल्या कार्यकर्त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष श्री रमाकांत राऊत यांनी यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना काढले.
यावेळी मंगेश गुरव,कुरगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,प्राजल कुबल,ऋषिकेश जाधव,वीरेंद्र चिके, जयंत जाधव,रवींद्र लाड यानी मनोगत व्यक्त करत कै.ज्ञानेश पवार यांना भावपूर्ण शब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. या संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे सचिव संतोष पाटणकर यांनी मानले.
















