संत राऊळ महाराज महाविद्यालयात योग दिन साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : संत राऊळ महाराज महाविद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांमार्फत योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. सदर योगा प्रात्यक्षिकामध्ये या दोनही विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनंत लोखंडे यांनी मन व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयाचे छात्र सेना समन्वयक लेफ्ट. डॉ. एस. टी आवटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. उमेश कामत, कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भारत तूपेरे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरयू असोलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर, निसर्ग मंडळाचे डॉ. योगेश कोळी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!