खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे कृषी दिनानिमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीक्षा पाटणकर तसेच शाळेच्या पालक सटविलकर, सौ.गुरव,सौ गुप्ता, शिक्षिका स्मिता कोरगावकर तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित महिला मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी कृषी दीन विषयी शालेय विद्यार्थ्याना माहिती दिली.तर प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पालकांच्या सहकार्याने किमान एक झाड लावावे. व पर्यावरण समतोल राखण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना ताळगावकर,सहायक शिक्षिका रुपाली पारकर,रेखा लांघी,अलका मोरे,आरती जेजोंन आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!