धामापूर सरपंच मानसी परब यांनी घेतली कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांची सदिच्छा भेट

प्रस्तावित कामे मार्गी लावल्याबद्दल केला सत्कार

उर्वरित कामांवर चर्चा करुन दिले निवेदन

चौके ( अमोल गोसावी ) :धामापूर गावच्या सरपंच मानसी महेश परब , उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ यांनी बुधवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांची विभागीय कार्यालय आंबडपाल , कुडाळ येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी धामापूर तलाव ते मळापोई ओढ्या पर्यंतचे गाळ सफाई चे काम मार्गी लावल्याबद्दल श्रीमंगले यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपअभियंता पी. आर. पाटील , शाखा अभियंता रमेश जोशी , धामापूर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे , स्वप्निल नाईक , प्रा. महेश धामापूरकर , सामाजिक कार्यकर्ते महेश परब , बाबू तोरसकर , आदी जण उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या वतीने धामापूर शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी असलेले धामापूर तलाव ते मळापोईपर्यंतच्या ओढ्यातील गाळ काढण्याचे काम मार्गी लावल्याबद्दल कार्यतत्पर कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांचे आभार मानले. तसेच धामापूर तलावाशी संबंधित सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील उर्वरित अपेक्षित कामे पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली यामध्ये उर्वरित ओढा आणि मळापोई मधील गाळ काढणे , आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे , धामापूर तलावात येणाऱ्या ओढ्यांमधून तलावात गाळ येउ नये म्हणून उपाययोजना करणे तसेच मुख्यत्वे करून तलावातील गाळ काढणे , धामापूर तलावात प्रदूषण मुक्त पॅडल बोट व इलेक्ट्रिक बोटींच्या सहाय्याने पर्यटकांसाठी बोटींग सुरू करणे यासह इतर जलसंधारणात्मक कामांबद्दल चर्चा करून ग्रामपंचायतच्या वतीने श्रीमंगले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी धामापूर सरपंच मानसी परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि धामापूर ग्रामस्थ , शेतकरी यांना अपेक्षित असलेली उर्वरित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले व जलयुक्त शिवार योजानेचा जास्तीत जास्त लाभ उठवावा असे आवाहनही केले.

error: Content is protected !!