रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्षपदी दिनेश आजगावकर

सचिव डाॅ संजय केसरे तर ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्ष संजना काणेकर, सचिव वैशाली पडते .

वार्षिक पदग्रहण समारंभ 12 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न होणार

कुडाळ (अमोल गोसावी) : रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ चा वार्षिक पदग्रहण समारंभ 12 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असून डिस्ट्रिक्ट 3170 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट शरद पै व इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर च्या दिपा जाधव प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे नूतन अध्यक्ष पदी दिनेश आजगावकर,उपाध्यक्ष पदी शशिकांत चव्हाण, सचिवपदी डाॅ संजय केसरे, खजिनदार पदी रूपेश तेली यांची निवड तर इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्षपदी संजना काणेकर,उपाध्यक्षपदी पदमा वेंगुर्लेकर,सचिवपदी वैशाली पडते, खजिनदार पदी डाॅ उज्वला सावंत ,आय एस ओ पदी राजश्री सावंत ,एडिटर पदी सानिका मदने,सी एल सी पदी पीडीसी डाॅ सायली प्रभू असणार आहेत अशी माहिती रोटरी व इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी रोटरीचे मावळते अध्यक्ष अमित वळंजू, नूतन अध्यक्ष दिनेश आजगावकर, असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे , डिस्ट्रिक्ट 3170 झोनल को -ऑर्डिनेटर प्रणय तेली ,माजी असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, सचिव डाॅ संजय केसरे ,खजिनदार रूपेश तेली ,माजी अध्यक्ष सचिन मदने,मकरंद नाईक, सई तेली ,ईनरव्हिल च्या पीडीसी डाॅ सायली प्रभू ,अध्यक्षा सौ संजणा काणेकर,सचिव सौ वैशाली पडते ,खजिनदार डाॅ उज्वला सावंत, उपस्थित होत्या.
रोटरी वर्ष 2023-24 वार्षिक पदग्रहण समारंभ प्रमुख उपस्थिती-
12 जुलै रोजीच्या वार्षिक पदग्रहण सोहळ्यात पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट शरद पै तर इनरव्हिल पदग्रहण अधिकारी म्हणून ईनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर च्या सौ दिपा जाधव उपस्थित राहणार आहेत .तसेच असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे ,राजन बोभाटे,संजय पुनाळेकर ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे व ईनरव्हिल क्लब चे पदाधिकारी-सदस्य उपस्थित राहणार आहेत.
रोटरीची नवी थीम–
रोटरी इंटरनॅशनल ची 2023-24 साठी नवीन थीम “Creat Hope in the World ” असून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला असणार आहेत डिस्ट्रिक्ट 3170 झोनल को ऑर्डिनेटर प्रणय तेली ,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एरिया एड गजानन कांदळगावकर ,असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे,राजन बोभाटे,संजय पुनाळेकर असणार आहेत .
रोटरी व्यवसाय सेवा पूरस्कार वितरण-
यावर्षीचा रोटरी व्यवसाय सेवा म्हणजे व्होकेशनल अवाॅर्ड कुडाळचे उद्योन्मुख व्यवसायिक भार्गवराम धुरी यांना देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ श्रीपाद पाटील विशेष सन्मान
नूकतीच सिंधुदुर्ग जिल्हाशल्यचिकित्सक पदी निवड झालेले डाॅ श्रीपाद पाटील यांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
रोटरी गुणवंत पाल्य व रोटेरियन्स सन्मान
वार्षिक पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या सदस्यांच्या शैक्षणिक प्रगतीत विशेष प्राविण्य संपादित केलेल्या रोटरी पाल्यांचा सन्मान करण्यात येणार असून विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या रोटरी सदस्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
2023-24 वर्षभरात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणार – नूतन अध्यक्ष दिनेश आजगावकर व सौ संजना काणेकर
सन 2023-24 वर्षात रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,मोतिबिंदू शस्त्रक्रिया,लहान मुलांना हृदय शस्त्रक्रिया ,कॅन्सर तपासणी शिबिर, जयपूरफूट शिबिर, एम एच एम कार्यक्रमांतर्गत कुमारवयीन मुलींसाठी विविध उपक्रम, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन अध्यक्ष दिनेश आजगावकर यांनी सांगितला.
इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ कडूनही वर्षभरात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे नूतन अध्यक्षा संजना काणेकर यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ नुतन पदाधिकारी – अध्यक्ष दिनेश आजगावकर, सचिव डाॅ संजय केसरे,खजिनदार रूपेश तेली,आयपीपी अमित वळंजू,उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, क्लब ॲडमिनीस्ट्रेशन मकरंद नाईक, क्लब प्रोग्राम राकेश म्हाडदळकर,क्लब कम्युनिकेशन काशिनाथ सामंत सर, क्लब अटेंडन्स डाॅ संजय निगुडकर, फेलोशिप आनंद वेंगुर्लेकर, सार्जंट आर्मस डाॅ जयसिंग रावराणे,मेंबरशिप डाॅ रविंद्र जोशी,रिक्वायरमेंट व सायटेशन नीता गोवेकर, रिटेंन्शन डी के परब, शिक्षण व मेंटाॅरिंग प्रणय तेली,मेंबरशिप असेसनेंट रविंद्र परब,पब्लिक रिलेशन ॲड राजीव बिले ,मिडिया रिलेशन सचिन मदने,जाहिरात व मार्केटिंग एकनाथ पिंगुळकर, एक्सटर्नल रिलेशन व सोशल मिडिया सई तेली,सर्वीस प्रोजेक्ट गजानन कांदळगावकर, व्होकेशनल राजीव पवार, कम्युनिटी डाॅ राजवर्धन देसाई, इंटरनॅशनल सर्वीस अजिंक्य जामसंडेकर,न्यू जनरेशन श्वेता नाईक, फंड रेजिंग प्रमोद भोगटे,रोटरी फाऊंडेशन सीए गजानन प्रभू, व्होकेशनल ट्रेनिंग संजय पिंगुळकर, डिस्ट्रिक्ट व ग्लोबल ग्रॅण्ड अभिषेक माने ,पोलिओ प्लस डाॅ जयश्री केसरे ,फंड रेजिंग राजेंद्र केसरकर यांची निवड करण्यात आली असून यासर्वांना पदग्रहण केले जाणार आहे.

ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ नूतन पदाधिकारी-अध्यक्षा संजना काणेकर,सचिव वैशाली पडते ,खजिनदार डाॅ उज्वला सावंत, उपाध्यक्ष पदमा वेंगुर्लेकर,आय एस ओ राजश्री सावंत,एडिटर सानिका मदने,आयपीपी वैशाली कुडाळकर,सीएलसी पीडीसी डाॅ सायली प्रभू ,ईसी मेंबर सौ शिल्पा बिले,मानसी जोशी ,सौ चित्रा बोभाटे ,सई तेली,सोनल आजगावकर,जान्हवी रावराणे यांना पदग्रहण केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!