मुख्यमंत्री,गृहमंत्री ,शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दिले निवेदन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर रू 20 हजार मानधनावर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याचा आदेश काढला या निर्णयावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने तीव्र विरोध दर्शवत मुख्यमंत्री ,गृहमंत्री ,शालेय शिक्षण मंत्री यांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचेमार्फत निवेदन पाठवून दिले आहे. यावेळी राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक ,राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे आदी उपस्थित होते.
राज्यातील प्राथमिक शाळांमधील मोठ्याप्रमाणात निर्माण झालेल्या रिक्तपदांवर नव्याने शिक्षक भरती होईपर्यंत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना रू 20 हजार मानधनावर नियुक्त करण्याचा अचंबित करणारा आदेश काढल्याने राज्यभरातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने दिलेल्या निवेदनात सदर आदेश तात्काळ रद्द करत सेवानिवृत्त ऐवजी स्थानिक डी एड बेरोजगार उमेदवारांना रू 20 हजार मानधनावर नियुक्त करण्याची मागणी केली आहे.