महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने वैभववाडीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

तालुक्यातील ३४ विद्यार्थांचा सराव परीक्षेत सहभाग

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखा वैभववाडी यांच्या वतीने आज मंगळवार दि.३१ जानेवारी, २०२३ रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सकाळी ११ वाजता पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी वैभववाडी तालुक्यातील इयत्ता ५ वीचे ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे नेते शरद नारकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे वैभववाडी तालुकाध्यक्ष रफिक बोबडे, शिक्षक समितीचे सल्लागार संजय पाताडे, प्राथमिक शिक्षक समितीचे सचिव महादेव शेट्ये, वैभववाडी केंद्र प्रमुख आबा जाधव तसेच पंढरीनाथ सावंत, अर्जुन रावराणे विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर नादकर, सुनील तांबे, सौ.राणे आदी प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. या परीक्षेसाठी विलास पाष्टे, स्वप्नील तोडकर, सुधीर गोसावी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सराव परीक्षेचे कामकाज पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!