पुणे भारत गायन समाज आयोजित नटसम्राट बालगंधर्व नाट्य संगीत स्पर्धा 2023 च्या अंतिम फेरीमध्ये कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिचा‌ संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक

शेठ न.म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणची विद्यार्थीनी

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता अभय ठाकुरदेसाई या विद्यार्थिनीने नुकतेच पुणे भारत गायन समाज आयोजित “नटसम्राट बालगंधर्व नाट्य संगीत स्पर्धेत” संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
या स्पर्धे करीता संपूर्ण महाराष्ट्रातून अंतिम फेरीसाठी फक्त १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. पुणे येथे झालेल्या या मोठ्या स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर या यशाने कु.प्राजक्ता हीने आपल्या शाळे बरोबरच आपल्या गावाचा देखील सन्मान वाढवला आहे.
खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडूरकर सर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन कु. प्राजक्ताला मिळाले. प्राजक्ताच्या या यशाबद्दल तिचे व तिच्या आई- वडिलांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष – श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष – भाऊ राणे, सचिव -महेश कोळसुलकर, खजिनदार – संदेश धुमाळे, सहसचिव – राजेंद्र वरूणकर, सर्व संचालक मंडळ सदस्य व मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक अजय गुरसाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.व तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!