कणकवली (प्रतिनिधी) : एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये ब्रिजिंग पर्सनॅलिटी चे श्री. ब्रिजेश तळवडेकर यांचा साँफ्टस्किल डेव्हलपमेंट संदर्भातला सेमिनार दिनांक १५ जुलै २०२३ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणुन आलेले श्री. ब्रिजेश तळवडेकर हे स्वतः एक सफल इंजिनिअर असुन, साँफ्टस्किल डेव्हलपमेंट बाबत मार्गदर्शन करण्याचा त्यांचा १५ वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे.
या सेमिनारमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना आपण समस्येवर कशाप्रकारे विचार करून स्वतःला कमी न लेखता यशाची शिखर कशी गाठु शकतो, तसेच दुसऱ्याची काँपी न करता, दुसऱ्या शी स्पर्धा न करता आपण आपली स्वतः ची ओळख बनवली पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व त्याकरिता काय करावे लागणार याबाबत मार्गदर्शन केले. सध्याच्या जगात असलेले साँफ्टस्किलचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख डाँ. एस टी माने यांनी सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. याचा लाभ महाविद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांनी तसेच इंजिनिअरींगला अँडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या ६० विद्यार्थ्यांनी घेतला व कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाच्या काँम्पुटर इंजिनिअरींग विभागाची विद्यार्थ्यीनी कु. संजना नाईक हिने पार पाडले.
या प्रसंगी प्राचार्य डाँ. महेश साटम, प्रशासकीय अधिकारी . शांतेश रावराणे,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी . ब्रिजेश तळवडेकर यांचे आभार व्यक्त केले.











