शिवसेना उबाठा च्या रणरागिणीनी किरीट सोमय्या च्या प्रतिमेला हाणले जोडे

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपचे नेते तथा माजी खा. किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हायरल व्हिडिओ विरोधात ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी ‘किरीट सोमय्याचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा घोषणा देत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर जोडे व लाथा मारून जाहीर निषेध केला.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव,वैदही गुडेकर, दिव्या साळगावकर, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, माधवी दळवी, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, राजू राठोड, महेश कोदे, मंगेश सावंत, विलास गुडेकर, सचिन राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे किरीट सोमय्या यांना भेट देण्यासाठी कपडे देण्यात आले. मात्र मी अशा प्रकारच्या वस्तू स्वीकारणार नाही.आपले लेखी निवेदन असेल  तर द्या ते स्वीकारू असे सांगत  कपडे घेण्यास नकार दिला.

 नीलम पालव म्हणाले, योणी सूचीता आणि मनोवाद जो पक्ष जपतो आहे. त्या पक्षाचा एक नेता कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठी ईडी, सीबीआयकडे तक्रार करत  त्या व्यक्तीवर कारवाईसाठी तो आग्रही असायचा. भ्रष्टाचार मुक्त देश झाला पाहिजे असे सांगणाऱ्या किरीट सोमय्याचे कालपासून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याबाबत किरीट सोमय्या काही बोलत नाहीत त्याचे कारण काय? ही व्यक्ती अनेक हनीट्रॅप तर झाली नसेल ना?  याबाबत ही व्यक्ती शोषित आहे की त्यांचे शोषण होत आहे? हा प्रश्न निर्माण होतोय. स्वतःच अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना जिल्हा महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांनी केला. तसेच त्यांनी किरीट सोमय्या यांना ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शर्ट व पँट पाठवण्यात येणार असल्याचे सांगून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

error: Content is protected !!