पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धर्मेंद्रकुमार यादवला शासकीय नोकरी द्या

आमदार नितेश राणेंनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडेंची भेट घेत केली मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेवून क्रीडा विषयक विविध प्रश्नांवर चर्चा केली.दरम्यान एशियन पॉवरलिप्टींग चॅम्पीयनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या धर्मेंद्रकुमार रामनयन यादव या ठाणे शहरातील गुणवंत खेळाडूला शासन सेवेत नोकरी मिळावी अशी मागणी करणारे निवेदन आमदार नितेश राणे यांनी क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे याना दिले.

धर्मेंद्रकुमार रामनयन यादव हे कळवा येथे राहत असून पॉवरलिप्टींग खेळातील एक गुणवंत खेळाडू आहेत. सलग दोन वर्ष (२०२२ व २०२३) मध्ये आंतरराष्ट्रीय एशियन पॉवरलिप्टींग चॅम्पीयनशिपमध्ये सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मागील दोन वर्ष भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहेत. धर्मेंद्रकुमार रामनयन यादव यांनी क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे शासन सेवेत थेट नियुक्तीसाठी दि. १७.११.२०२२ रोजी अर्ज केला होता. तरी त्यांच्या अर्जाची दखल घेऊन या गुणवंत खेळाडूच्या उज्वल भविष्यासाठी शासन सेवेत योग्य त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी, ही विनंती नितेश राणे यांनी निवेदनातून केली.तर प्रत्यक्ष भेटीत क्रीडा विषयक अनेक विषयांवर चर्चा केली.

error: Content is protected !!