देवगड तालुक्यात स्थानिक पोलिस आणि एलसीबी कडून गोवा बनावटीची दारू जप्त

देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व देवगड पोलिसांच्या धडक कारवाईत तोरसाळे येथे 24 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई 18 व 19 जुलै दोन दिवसामध्ये करण्यात आली.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि देवगड पोलिसांनी तोरसोळे, आरेाटा येथे तीन ठिकाणी धाडी टाकून केलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे 24 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करून बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा उद्देशाने दारू बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई केली आहे. ही कारवाई 18 व 19 जुलै रोजी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने 19 जुलै रोजी धडक कारवाई करून तोरसोळे पारवळ तीठा येथील सुवर्णा जनरल स्टोअर्स पाठीमागे किलतानाच्या पिशवीमध्ये असलेल्या 14 हजार रूपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या 140 बाटल्या जप्त केल्या.गैरकायदा बिगरपरवाना चोरटा दारू विक्रीचा धंदा करण्याचा उद्देशाने दारू जवळ बाळगल्याप्रकरणी कांता राजाराम कांडव(47) रा.तोरसोळे आंबोळवाडी याच्यावर दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) प्रमाणे कारवाई केली आहे.ही कारवाई 19 जुलै रोजी दुपारी 1.20 वा.दरम्यान केली.

वळीवंडे आरोटा गणराज रोपवाटीका येथे 19 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये दत्तात्रय मुरलीधर सावंत(45) रा.वळीवंडे आरोटा यांच्याजवळ गैरकायदा बिगरपरवाना दारू विक्री करण्याचा उद्देशाने सुमारे 9 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळाले.याबाबतची फियार्द स्थानिक गुन्हा बअन्वेषण विभागाचे पोलीस कॉन्टेबल रवी इंगळे यांनी दिली.
देवगड पोलीसांनीही 18 जुलै रोजी सायंकाळी 7.45 वा.दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये तोरसोळे पारवळवाडी येथील सुवर्णा जनरल स्टोअर्सला लागून असलेल्या चिरेबंदी कंपाऊंड च्या आडोशाला 960 रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली.बेकायदेशीरपणे, बिगरपरवाना गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचा उद्देशाने बाळगल्याप्रकरणी सतिश गंगाराम परब(50) रा.तोरसोळे पारवळवाडी याच्यावर कारवाई केली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्टेबल प्रसाद आचरेकर यांनी दिली.

error: Content is protected !!