माधवबाग व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर चे आयोजन
1200 रु.ची तपासणी होणार केवळ 99 रु.मध्ये
कणकवली (प्रतिनिधी): माधवबाग आणि नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै रोजी सकाळी 9 : 30 ते सायं.4 :30 वाजेपर्यंत अतिरक्तदाब व मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम तसेच हृदयरोग अतिरक्तदाब मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात 1200 रु खर्चाच्या तपासण्या केवळ 99 रुपयांत केल्या जाणार आहेत. माधवबाग कणकवली ,कुडाळ, सावंतवाडी मध्ये शिबिर घेतले जाणार आहे माधवबाग तपासणी अंतर्गत ईसीजी, रँडम ब्लड शुगर, एस पी ओ 2 , हार्ट रेट, ब्लड प्रेशर चेकअप केले जाणार आहे. नेत्र तपासणी अंतर्गत डोळ्याचा प्रेशर ( दाब ) तपासणी, डोळ्याचा मागचा पडदा ( रेटिना ) तपासणी, चष्मा नंबर तपासणी, मोतीबिंदू तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर मधुमेही अतिरक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक असून कणकवली मोबा.9373183888, कुडाळ मोबा. 9011328581, सावंतवाडी मोबा. 7774028185 वर संपर्क साधावा.











