ढगफुटीसदृश पावसाचा कुडाळला तडाखा ; अनेक रस्ते पाण्याखाली

शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली ; दुपारनंतर वाढला पावसाचा जोर

कुडाळ (अमोल गोसावी) : मागील चार दिवस सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असतानाच दुपारपासून मात्र पावसाने पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू केली आहे. कुडाळ तालुक्यात सोसाटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून यामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावरही पाणी आलेले दिसून येत आहे.

कुडाळ तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. ग्रामीण भागातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. माणगाव खोऱ्यात सुद्धा पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून निर्मला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. संध्याकाळपर्यंत असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास भंगसाळ नदीला सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे. एकंदरीत प्रशासनाने नदीकिनारी आणि डोंगर भागातील गावांमध्ये राहाणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

error: Content is protected !!