बीडीओ विजय चव्हाण यांची हटके संकल्पना
कुडाळ(प्रतिनिधी) : येथील पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत ‘चिखलधुणी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम २६ जुलैला सकाळी ९ वाजता अणाव – हुमरमळा येथे राबविण्यात येणार आहे. नवीन पिढी मातीपासून दूर गेली असून त्यांची नाळ पुन्हा मातीशी जोडली जावी या हेतूने या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये जोत बांधून पारंपरिक शेती व आधुनिक पद्धतीची शेती लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर नरेगा अंतर्गत बाबू आणि फळ लागवड उपक्रम राबवून अशा विविध उपक्रमांनी चिखलणी साजरी केली जाणार आहे, अशी माहिती कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.