काळसे बागवाडा शाळेचे शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत यश


चौके (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा काळसे बागवाडा, ता मालवण, ने यश प्राप्त केले असून दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
सन २०१७ पासून जि प प्राथमिक शाळा काळसे बागवाडा शाळेत इयत्ता ५ वीचा वर्ग सुरू करण्यात आला. अवघड क्षेत्रात असलेल्या या शाळेत २०१६ पासून स्पर्धा परीक्षा विशेष मार्गदर्शन हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थी गुणवत्ता यावर विशेष भर देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. इयत्ता १ ली पासून ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा,सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा,शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.

इयत्ता ५ वी नवोदय परीक्षेत शाळेची निर्जला गणेश बावलेकर या विद्यार्थिनी ची नवोदय विद्यालय साठी निवड झाली तसेच शाळेचा विद्यार्थी पार्थ शंकर सूर्यवंशी याने शिष्यवृत्ती परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. तो जिल्ह्यात १३ वा व तालुक्यात ३ रा आल्याबद्दल त्याचे ग्रामस्थ व शा व्य समिती यांनी अभिनंदन व कौतुक केले . स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक महेश कदम व मुख्याध्यापक शितल परुळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समिती सदस्य व विषयतज्ञा गौरी नार्वेकर यांनी बहुमोल सहकार्य केले.

error: Content is protected !!