ब्युरो न्युज (मुंबई) : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मिळणार मोफत उपचार मिळणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.













