मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळे शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या, व शैक्षणिक साहित्याचे वाटप

खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते वितरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपल्याला टिकायचे असेल तर त्या दृष्टीने आतापासूनच तयारी करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे जेणेकरून करिअरची निवड योग्य दिशेने होईल असे प्रतिपादन खांबाळे सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण यांनी केले.खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना ठाकरे गटाचे वैभववाडी तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळे मोहितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या, व शैक्षणिक साहित्याचे वाटप सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी चव्हाण बोलत होते. त्यांनी या शाळेतील विद्यार्थींनी विविध स्पर्धा परीक्षेत चमकदार कामगीरी केल्याबद्दल मुख्याध्यापक सुहास रावराणे सर, शिक्षिका शोभाताई केळकर यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.अंगणवाडीतील लहान मुलांनाही अंकलीपी देऊन गौरविण्यात आले. तसेच पोषण आहार बनविणाऱ्या सीताबाई जिनगरे यांनाही छत्री भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी उपसरपंच गणेश पवार,मुख्याध्यापक सुहास रावराणे,शोभाताई केळकर मॅडम, शांताराम मोहिते,गणेश सदाशिव पवार,किरण पवार,विलास मोहिते,रुपेश कांबळे,सचिन कर्पे, जयेश पवार,पंकज चव्हाण, अभिषेक माळकर,अंगणवाडी सेविका पूजा पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक सुहास रावराणे यांनी मानले.

error: Content is protected !!