सहाव्या दिवशीही बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच ! मुंबईकरांचे प्रचंड हाल

ब्युरो न्युज (मुंबई) : बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. पण कामगारांच्या या आंदोलनामुळे मुंबईकर मात्र हैराण झाले आहेत. पण यावर तोडगा काढण्यास सरकार प्रशासनाला अजून यश आलं नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा संप किती दिवस चालणार आणि मुंबईकरांचे आणखी किती दिवस हाल होणार असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

दररोज 35 लाख लोक बेस्ट बस ने प्रवास करत असतात. बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कोणत्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. गेली अनेक वर्ष भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे “बेस्ट”. मात्र मागील काही वर्षांत झालेल्या तोट्यामुळे या व्यवस्थेचं संपूर्ण चित्रच पालटलं असल्याचं म्हटलं जात आहे. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावरील बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत. विविध मार्गांवर चालविण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावरील बसेसवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालक आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे.

error: Content is protected !!