विधानसभा संपर्कप्रमुख शेलेश परब यांच्यावतीने करण्यात येणार सन्मान
सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सावंतवाडी विधानसभा मतदार संपर्कप्रमुख शेलेश परब यांच्या वतीने शनिवार 4 फेब्रुवारीला सावंतवाडी येथील आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्याचा सत्कार शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब याच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हा संघटक जानवी सावंत सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान केला जाणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत शिंदे गट सामील झाला असला तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये काहीही फरक पडलेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसेनिकानी प्रामाणिकपणे प्रचार यंत्रणा राबवून काम केले त्यामुळे महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.
तरी सावलवाडी तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सदस्याने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुका संघटक मायकल डिसोजा तालुका महिला संघटक रश्मी माळवदे यांनी केले आहे