ल.गो.सामंत विद्यालयाच्या प्रतीक्षा पाटीलचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2022- 23 आर. पी. डी.विद्यालय ,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले होते .या विज्ञान प्रदर्शनामध्ये हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ,मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकूळ बुद्रुक ची इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा संजय पाटील हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

शुक्रवार दिनांक -03-02-2023 रोजी सकाळी प्रशालेमार्फत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष ओमप्रकाश ताम्हाणेकर, शालेय समिती सदस्य रामचंद्र (बाळा )वर्देकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.नेवाळकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रतिक्षा पाटील हिचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शालेय समिती अध्यक्ष ओमप्रकाश ताम्हाणेकर यांनी पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. मार्गदर्शक शिक्षिका आर.आर.नवाळे यांनी प्रतीक्षाचं कौतुक केले तसेच मिळालेल्या संधीचं सोनं करा असं विद्यार्थ्यांना आवाहन केलं. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका एस. एस.तांबे यांनीकेले. आभार प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. पाटील यांनी केले.

error: Content is protected !!