आंबोली मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपी तुषार पवार ला 7 दिवस पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली येथील खुनासह अट्रोसिटी ऍक्ट च्या गुन्ह्यातील आरोपी   तुषार उर्फ निखिल शिवाजी पवार ( रा.कराड, जि.सातारा ) याला विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. सुशांत आबासाहेब खिलारे ( रा.कोसगाव, पंढरपूर ) याला आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारातून काठी आणि बेल्टने मारहाण करत त्याचा खून तुषार पवार सह अन्य मयत आरोपी भाऊसो अरुण माने याने केल्याचा गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सावंतवाडी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके करत आहेत. आरोपी तुषार याला पोलीस कोठडी मिळण्यासाठी सरकार पक्षातर्फे पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले. आरोपी तुषार पवार याने मयत सुशांत यास मारहाण करून ठार मारलेल्या गोळेश्वर मानेवस्ती कराड येथील घटनास्थळी पंचनामा करणे, मयताला मारहाण करण्यासाठी  वापरलेले दांडे पट्टे जप्त करणे, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे, आर्थिक देवाणघेवाणी व्यतिरिक्त आरोपीचे मयत खिलारेशी अन्य काही वाद होते काय ?याचा तपास करणे, गुन्ह्यात आरोपीला अन्य कोणी सहकार्य केले आहे काय ?, या गुन्ह्यातील पंढरपूर, कराड, इस्लामपूर येथील साक्षीदारांकडे तपास करणे, मयत खिलारे ला आंबोलीच्या दरीत टाकताना अन्य आरोपी भाऊसो माने पडून मयत झाला आहे त्याला आरोपी तुषार याने ढकलले अथवा कसे ?याचा तपास व्हायचा आहे. अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर आरोपी तुषार पवार याला विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली.

error: Content is protected !!