आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सतीश सावंत समर्थक शिवसैनिक भाजपात दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या भिरवंडे गावातच उ.बा.ठा शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपाने खिंडार पाडले आहे. आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत संदीप ( सॅनडी ) सावंत, सुदर्शन सावंत, शुभम सावंत, गौरव सावंत, सुरेंद्र सावंत,जयेश सावंत, तुषार राणे, सुदर्शन वरक, रुपेश सावंत, रोशन चेंदूरकर, संकेत वरक, देवेंद्र दळवी, हार्दिक सावंत, गणेश सावंत,तनिश सावंत,सिद्धेश सावंत,संतोष सावंत,किशोर सावंत (बाबलो),मिलिंद सावंत, अविनाश सावंत, तेजस सावंत, वैभव सावंत, सुनील सावंत,अचित राणे,जयदीप राणे, यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत,गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, रमेश सावंत, संतोष सावंत उपस्थित होते.













