खांबाळे गावातील महिलांना घडविले पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर मोफत देवदर्शन

शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पं. स. सदस्य मंगेश लोके यांचा सामाजिक उपक्रम

120 महिलांनी घेतला लाभ

वैभववाडी (प्रतिनिधी): खांबाळे गावचे सुपुत्र, माजी पंचायत समिती सदस्य तथा वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी आपल्या सामाजिक भावनेतून गावातील ज्या महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्य काही गैरसोयीमुळे मनात असूनही या ठिकाणी जाऊन देव दर्शन घेता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिक महिला व गावातील अन्य महिला मिळवून सुमारे 120 महिलांना अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर देवदर्शनाचा लाभ दिला. प्रत्येक ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना दर्शन देतेवेळी मंगेश लोके मित्र मंडळाने प्रत्येक व्यक्तीचे योग्य नियोजन केले होते तीन दिवसाच्या या यात्रेमध्ये प्रत्येक माणसाला नाष्टा, जेवण, पाणी व अन्य गरजेच्या वस्तू या सर्वांचे अगदी या मित्रमंडळाने नीटनेटके नियोजन केले होते.

प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरातील व्यक्ती प्रमाणे ज्येष्ठ नागरिक महिलांची काळजी घेत होते. त्यांना लागणारी औषध गोळ्या यांची सुद्धा खबरदारी घेतली होती. अक्कलकोट, पंढरपूर येथे सर्वांच्या रात्रीची राहायची व्यवस्था सुद्धा योग्य प्रकारे केली होती. प्रत्येक ठिकाणी मंगेश लोके व त्यांचे सहकारी आपल्या लोकांचे योग्य ती खबरदारी घेत होते. त्यामुळे देवदर्शनाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रवास खूप सुखकर झाला.

यावेळी अक्कलकोट देवस्थान स्वामी समर्थ ट्रस्टचे चेअरमन महेश इंगळे महाराजांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तुळजापूर संस्थानचे प्रमुख संदीप कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार यांनी सुद्धा तुळजापूर देवस्थानच्या वतीने मंगेश लोके व त्यांच्या सहकाऱ्यांचा फेटा व पुष्पहार घालून सन्मान केला.

सर्वांच्या सहकार्यामुळे या सर्व ठिकाणचे देवदर्शन गावातील सर्व महिलांना चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा त्रास व गैरसोय न होता पार पडले. तुळजापूर देवस्थानचे पुजारी संदीप कदम व उपजिल्हाप्रमुख शाम पवार तसेच अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे मंगेश लोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे या सर्व यात्रेच्या निमित्ताने ही यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी योग्य असे नियोजन केले होते. त्यामध्ये गावचे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, दीपक पवार, सिने – दिग्दर्शक दीपक कदम, सोसायटीचे माजी चेअरमन सुनील पवार, दत्तात्रय परब, प्रमोद लोके, गुरुनाथ गुरव, महेश लांजवळ, दिनेश सावंत,गणेश सदाशिव पवार, मेघनेष पवार, पंकज चव्हाण, छोटू गुरव, सुनील सुतार, विलास मोहिते व मंगेश लोके मित्र मंडळाचे हितचिंतक या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!