देवगड जामसंडे शहर पाणीपुरवठ्यासाठी 7 कोटी 31 लाख निधी मिळणार ; मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा साक्षी प्रभूंची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

अन्नपूर्णा नळपाणी पुरवठा योजनेचे होणार नूतनीकरण आणि मजबुतीकरण

शहरवासीयांना लवकरच होणार सुरळीत पाणीपुरवठा

देवगड(प्रतिनिधी) : देवगड जामसंडे शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अन्नपूर्णा नळपाणी योजनेसाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे 7 कोटी 31 लाख रुपये निधीची मागणी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबईत मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत दहीबाव नदीवरील अन्नपूर्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरण कामाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी लेखी निवेदन सादर केले.यावेळी विधानसभा संघटक संदेश पटेल, देवगड तालुकाध्यक्ष अमोल लोके,नगरसेवक रोहन खेडेकर उपस्थित होते. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी यावेळी देवगड जामसंडे शहराला होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या साठी तात्काळ निधी मंजूर करत असल्याची ग्वाही देत पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशा सूचना वजा आदेश दिले.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात स्वतः पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याचे सांगत त्या दौऱ्यात देवगड जामसंडे नगरपंचायत ला भेट देणार असल्याचेही सांगितले. चार दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याकडे मंत्री पाटील यांचे जिल्हाप्रमुख आग्रे आणि नगराध्यक्षा प्रभू यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले. देवगड जामसंडे शहराला 14 किमी अंतरावरील दहीबाव नदीपात्रातील अन्नपूर्णा नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो.ही संपूर्ण जलवाहिनी एम एस असून बहुतांश जलवाहिनी ही खाडीकिनारी आहे. त्यामुळे पाईपलाईन गंजली असून सच्छिद्र पाईपलाईन मधून पाणी वायस जाते.त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होतो. दहीबाव नळयोजनेवर सध्या 1 पंप आणि मोटर सुरू असून हा पंप आणि मोटर कमी कार्यक्षमतेने पाणी उपसा करत आहे. याचा परिणाम शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठ्यावर होत असून नगरपंचायत ला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.यासाठी सदर नळपाणी योजनेचे नूतनीकरण आणि मजबुतीकरण साठी 7 कोटी 31 लाख निधी आवश्यक आहे. यातून बेलवाडी सडा सलोह उंच पाणीटाकीकडे जाणारी पाईपलाईन 20 लाख, दहीबाव नदीपात्रात ट्रेच गॅलरी बांधकाम 26 लाख, दहीबाव येथील पंप स्टेधन ते इळये सडा पाणी टाकी उदभव वाहिनी तसेच इळये सडा टाकीपासून खाक्षी साठवण टाकीच्या गुरुत्व वहिनी चे नूतनीकरण व बळकटीकरण साठी 3 कोटी 60 लाख, दहीबाव पंप स्टेशनधील पम्पमिंगशिन चे 2 सेट व नवीन ट्रान्सफर्मर 1 कोटी 45 लाख , तलेबाजार एमएसइबी सबस्टेशन ते दहीबाव पम्पमिंग स्टेशन विजजोडणी साठी 11 केव्ही एच टी लाईन बसवणे साठी 1 कोटी 80 लाख असे एकूण 7 कोटी 31 लाख निधीची मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली. मंत्री पाटील यांनी तात्काळ हा निधी मंजूर करून देत असल्याची ग्वाही दिली. तसेच कोर्ले सातांडी धरण आणि देवघर धरणातून देवगड शहराला पाणीपुरवठा करणासाठी प्रस्तावित असलेल्या नळपाणी पुरवठा योजना आणि त्यासाठी लागणारा निधी याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!