केंद्र सरकारच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे सुतार कारागिरांना न्याय- शरद मेस्री-अध्यक्ष-विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज सिंधुदुर्ग

आचरा (प्रतिनिधी) : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरु करण्याबद्दल घोषणा केली आणि दि. 16 ऑगस्टला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना मंजुर केली. पारंपारिक कारागीर आणि सुतार समाजातील वंचित वर्गाला न्याय दिला आहे. सिंधुदुर्ग विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, असे प्रतिपादन विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री यानी केले. देशाच्या पारंपारिक कौशल्य क्षमतेला नवी उंची देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दि. 16 ऑगस्ट 2023 ला 13000 कोटी खर्चाच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. याबद्दल विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री यांनी आनंद व्यक्त केला. या योजनेमुळे छोट्या कामगारांना कौशल्य विकासाबरोबरच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल. 30 लाख कुटुंबांना लाभ देणा-या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानतो.

या योजनेचा लाभ समाजाच्या वंचित स्तरांमध्ये मजुरी व कारागिरी करणा-या कारागिरांना मिळणार असून यात 18 प्रकारच्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. कारागिरांना व शिल्पकारांना या माध्यमातून “विश्वकर्मा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ओळखपत्र सुद्धा देण्यात येतील. या योजनेच्या माध्यमातून प्रथम किस्त एक लाख रुपये व द्वितीय किस्त दोन लाख रुपये फक्त पाच टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारागिरांना त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक साहित्याचा संच, कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण, डिजिटल व्यवहारासाठी साहाय्य, इत्तर वित्तीय साहाय्य यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!