सोबत सिंधुदुर्ग माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आवटी मॅडम यांचीही उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेला पुणे शिक्षण संचलनालय कार्यालयातील शिक्षण सहसंचालक श्रीमती अनिता कडू मॅडम यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.यावेळी शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याद्यापक श्री संजय सानप यांनी त्यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.
माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी योजना व नवभारत साक्षरता अभियान याबाबत आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रशालेला भेट दिली त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी आवटी मॅडम याही उपस्थित होत्या. याप्रसंगी खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत,राजेश वारंगे सर आणि इतर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य संजय सानप यांनी सहसंचालिका मॅडमना सर्व शालेय बाबींची माहिती दिली. सर्व शाळा बघितल्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रगतीबाबत तसेच भौतिक सुखसोयींबाबत समाधान व्यक्त केले. तसेच प्रशालेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी शिक्षण सहसंचालिका अनिता कडू मॅडम तसेच सिंधुदुर्ग जिल्हा उपशिक्षणाधिकारी आवटी मॅडम यांचे शाळेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.













