तरंदळे गावातील जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे सरपंच सुशिल कदम यांच्या संकल्पनेतून तरंदळे ग्रामपंचायत वतीने शिक्षकांच्या व मुलांच्या मागणी नुसार शाळा तरंदळे नं. 1 येथे प्रिंटर प्लस झेरॉक्स मशीन देण्यात आली.तरंदळे शाळा नं. 2 येथे स्मार्ट टीव्ही देण्यात आली.तरंदळे नं. 3 येथे ऑफिस कपाट देण्यात आले.तरंदळे शाळा नं.4 येथे ऑफिस कपाट देण्यात आले.

यावेळी सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य.सुनील दत्त जाधव,माजी सरपंच सुधीर सावंत,माजी उपसरपंच संदेश सावंत,शाळा नंबर 1 चे शिक्षक श्री.पोकळे श्री.डोईफोडे, श्री.तळदेवकर,श्री.कांबळी,शाळा नंबर 2 च्या शिक्षिका साै.लोकरे,अंगणवाडी सेविका साै.पावसकर,संजय परब,शाळा नंबर 3 चे श्री.तांबे,अनिल खरात,शाळा नंबर 4 चे साै.तांबे व ग्रामस्थ,शाळेतील मुले उपस्थित होते.

error: Content is protected !!