मनसेनं दिल रविंद्र चव्हाणांना यात्रेचं निमंत्रण
ब्युरो न्युज (मुंबई) : कोकणात मुंबई गोवा महामार्ग रखडला असून रायगड जिल्ह्यात या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या गाड्या वाटेतच पंक्चर होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अनेकांना पाठदुखी सारखे आजार उद्भवले आहेत. रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गाप्रकरणी मनसे उद्या पदयात्रा काढणार आहे. मनसेनं या यात्रेचं जाहीर आमंत्रण सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलंय, तर लोकशाही मार्गानं यात्रा नक्की काढा मात्र जिथे महामार्गाचं काम सुरू आहे, तिथे नुकसान करु नका, अशी विनंती राज ठाकरेंना केल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय.











