कणकवली (प्रतिनिधी) : जेव्हा शाळेचे विद्यार्थीच शिक्षक बनतात आणि संपूर्ण दिवस व्यवस्थापन पाहतात असा एकमेव दिवस म्हणजे ५ सप्टेंबर, शिक्षक दिन.भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा सर्व शाळांमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे शिक्षक दिन माेठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
इयत्ता चौथीचे विद्यार्थी कु.आरोही जाधव,कु. विघ्नेश बांदिवडेकर,कु. हेमंत गावकर हेच शिक्षक बनले आणि पूर्ण दिवस शाळेचे व्यवस्थापन उत्तमरीत्या पार पाडले.विद्यार्थी खुश होते.अशा खेळीमेळीच्या वातावरणात आजचा पूर्ण दिवस खूप आनंदात गेला . शिक्षक बनल्यानंतर कोणत्या अडचणी येतात, त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हेही नकळतपणे विद्यार्थ्यांना समजलं आणि सर्वांनी आनंदाने हा दिवस साजरा केला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी आंगणे मॅडम ,शिक्षिका शितल गाेवेकर मॅडम यांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
















