एस. एम.हायस्कूल ला 1995-1996 दहावीच्या बॅचकडून ‘वॉटर प्युरिफायर’ भेट

कणकवली (प्रतिनिधी) : शाळा आपले जीवन घडवते. या शाळेच्या ऋणांतून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून एस. एम.हायस्कूल कणकवलीच्या शैक्षणिक वर्ष-1995-1996 च्या इ.१० वी च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक सहयोगातून प्रशालेला शुद्ध व स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने ‘वॉटर प्युरिफायर’ संच भेट दिला. या वॉटर प्युरीफायर संचाचे उद्घाटन व प्रदान सोहळा कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी. एम. नलावडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी विद्यार्थी अभिजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक जी. एन. बोडके यांनी आभार व्यक्त केले. यावेळी या बॅचमधील माजी विद्यार्थी विशाल (दादा)मुंज, सत्यप्रकाश सावंत , पर्यवेक्षक जी.ए.कदम सी.डी.हिर्लेकर, एस.सी.गरगटे,एम टी सुतार,श्री.जगदाळे, सुहास मुसळे इतर शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी विध्यार्थी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!