कणकवली कॉलेजमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर संपन्न
कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग कणकवली कॉलेज कणकवली च्या वतीने बारावी सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा एच पी सी एल सभागृहात आयोजित केली होती. निवडश्रेणी तथा अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग तथा अप्पर जिल्हाधिकारी डॉ ज्योत्स्ना पडियार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रा डॉ युवराज महालिंगे, प्रा चव्हाण, जात पडताळणी समिती व्यवस्थापक संतोष कदम, दक्षता पथक हवालदार गंगावणे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश आरेकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. महालिंगे यांनी मानले.











