प्रल्हाद मुणगेकर यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): मुणगे बौद्धवाडी येथील प्रल्हाद महादेव मुणगेकर (७४ वर्ष) यांचे गुरुवारी दुपारी दोन वाजता दुःखद निधन झाले. मिठबाव हायस्कुल मधून शिक्षकेतर कर्मचारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे ज्युनिअर कॉलेजचे कर्मचारी संतोष मुणगेकर यांचे वडील तर चिपळूण येथील तंत्रस्नेही आदर्श शिक्षक सतीश मुणगेकर यांचे काका होत.

error: Content is protected !!