पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे वैभववाडी तहसीलदारांचे आवाहन

स्थगित नोकर भरती, कंत्राटीकरण, नोंदणीची कागदपत्रे यांचा मतदार नोंदणीवर परिणाम

केवळ १३८ पदवीधर मतदारांचा मतदार नोंदणीत सहभाग

वैभववाडी (प्रतिनिधी) : पदवीधर नोंदणीत भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या कोकण पदवीधर मतदार संघामध्ये मतदार नोंदणी करण्यात येत आहे. वैभववाडी तालुक्यात मतदार नोंदणी संबंधित सर्व पक्षीय बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र म्हणावा तितका प्रतिसाद गेल्या महिनाभरात वैभववाडी तालुक्यात लाभलेला दिसत नाही. आता पर्यंत फक्त १३८ पदवीधरांनी वैभववाडी तहसीलदार कार्यालयात निवडणूक शाखेत आपले अर्ज सादर केले आहेत. रखडलेली शिक्षक भरती, खाजगीकरण, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, मतदार नोंदणी करीता कागदपत्रांच्या अटी या सर्व गोष्टींचा परिणाम पदवीधर मतदार नोंदणीमध्ये पहायला मिळत आहे. पदवीधर मतदारांची उदासीनता या नोंदनीच्या माध्यमातून उघड होताना दिसत आहे.

दि.६ नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत कोकण पदवीधर मतदार संघात नोंदणी करता येणार आहे. तरी पदवीधर मतदारांनी ६ नोव्हेंबर पर्यंत ऑफलाईन पद्धतीने किंवा पुढील संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने https://gterollregistration.mahait.org आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार वैभववाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!