घातपात की अन्य काही ?
कणकवली (स्वप्नील तांबे) : गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओझरम-माळवाडी येथील ज्योती अंकुश मेस्त्री (१६) या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ओझरम तलावाच्या पाण्यात आढळून आला. ज्योती तलावात कशी पडली, हे समजू शकलेले नाही. ज्योती ही कासार्डे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावीत शिकत होती. १३ ऑक्टोबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या आईने पोलीस ठाण्यात खबरही दिली होती. दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास लघु पाटबंधारे विभाग फोंडा येथील कर्मचारी तथा सध्या ओझरम धरण येथे वॉचमन म्हणून काम पाहत असलेले चंद्रकांत पडवळ हे तलावाच्या पाण्याची पातळी बघायला गेले होते. ते पातळी मोजण्याच्या पट्टीकडे आले असता त्यांना हा मृतदेह दिसला. पडवळ यांनी कळविल्यानुसार ओझरमचे उपसरपंच प्रशांत राणे, पोलीस पाटील तुषार तांबे आदी घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ज्योती हिच्या कुटुंबियांनाही बोलविण्यात आले. त्यांनी पाहणीअंती मृतदेह ज्योती हिचाच असल्याचे घटनेबाबत पडवळ सांगितले. यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रथम दर्शी ही आत्महत्या असल्याचे दिसले तरी हा घातपात असल्यानचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
